मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तिवरे धरणग्रस्तांसाठी मागणी केली आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावाप्रमाणे इथल्या लोकांचे पुनर्वसन करा असं पवारांनी म्हटलं आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. यामध्ये लोकांची घरे, पीकं आणि शेतजमीनीही वाहून गेल्या आहेत. राज्य सरकारने पीडितांना दिलेली ४ लाखांची मदतही तुटपुंजी असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण 2 जुलैच्या रात्री फुटलं. त्यामुळे 23 जण वाहून गेले, त्यापैकी 20 मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत.या दुर्घटनेनंतर शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच चिपळूण तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त तिवरे धरण परिसराची पाहणी केली. पवारांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन विचारपूस केली. या दौऱ्यानंतर पवारांनी दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पीडितांना धीर देण्याची विनंती केली आहे.
COMMENTS