नवी दिल्ली – काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर पवार यांनी प्रतिक्रिया दिली. सोनिया गांधींशी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी माहिती देण्याचं ठरलं होतं. त्याप्रमाणे आज भेट घेऊन माहिती दिली. शिवसेना सातत्याने आपलं मुखपत्र सामनातून सातत्याने भाजपविषयी लिहीत आहे. आम्ही चर्चा करुन पुन्हा भेटण्याचं ठरवलं असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने चर्चा केली असून महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन करण्यावर ही चर्चा झाली आहे. मुंबईमधील नेत्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. आम्हाला सरकार बनविण्यासाठी आमच्याकडे संख्या नाही असंही पवारांनी म्हटलं आहे.यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलही सोबत होते.
COMMENTS