मुंबई – लोकसभेतील पराभवाचा बदला विधानसभा निवडणुकीतून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कंबर कसली आहे. पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी शरद पवार हे महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांच्या जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. पवार यांच्या या मॅरेथॉन बैठकांना 13 जूनपासून सुरुवात होणार आहे. या बैठकीत पवार हे कार्यकर्त्यांच्या स्थानिक समस्या, लोकसभेचं मतदान, विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार अशा विषयांवर चर्चा करणार आहेत.
बैठकांचं वेळापत्रक
कोकण – 13 जून
उत्तर महाराष्ट्र – 14 जून
पश्चिम महाराष्ट्र – 15 जून
विदर्भ – 21 जून
मराठवाडा – 23 जून
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नव्या तरुणांना संधी देण्याची शक्यता आहे. प्रस्थापित आणि गेली अनेक वर्ष सत्तेचा उपभोग घेणा-या नेत्यांचा लोकांना कंटाळा आलाय. याची जाणीव शरद पवारांना झाली आहे. त्यामुळे नवीन पिढीला निवडणूक प्रक्रियेत संधी दिली पाहिजे. लोकांना बदल हवा आहे. नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. कष्टकरी तरूण चेहरांना संधी दिली पाहिजे. हा सर्व बदल करण्याची खबरदारी प्रदेशाध्यक्षांनी घ्यावी,’ अशी सूचनाही पवारांनी केलीआहे.
तसेच जुन्या नेत्यांवर लोकांचा राग असल्याने पक्षाची दुरावस्था झाली. त्यामुळे जुन्या नेत्यांना डावलून नव्यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याने जुन्या नेत्यांची चिंता वाढली आहे. तसेच नवीन कोणत्या चेह-यांना संधी मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.
COMMENTS