शरद पवार देणार भाजपला आणखी एक धक्का, राज्यात हा पॅटर्न राबवणार!

शरद पवार देणार भाजपला आणखी एक धक्का, राज्यात हा पॅटर्न राबवणार!

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचे संकेत स्वत: शरद पवार यांनी दिले आहेत. महाविकास आघाडीचा पॅटर्न आता मुंबई महापालिकेत दिसण्याची शक्यता आहे. 2022 ला मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत स्वत: शरद पवार यांनी दिले होतं. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपला धक्का देण्यासाठी पवारांची तयारी सुरु झाली असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेत शिवसेनेला भाजपची मोठी टक्कर असणार आहे. भाजपकडून मुंबई महापालिकेत आमचीच सत्ता येईल असा दावा करण्यात आला होता.तसंच भाजप नेत्यांकडूनही मुंबई महापालिकेसाठी हालचाली सुरु झाल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे भाजपला जोरदार टक्कर देण्यासाठी आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS