शरद पवार, नारायण राणे यांच्यात थोड्याच वेळात बैठक, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण !

शरद पवार, नारायण राणे यांच्यात थोड्याच वेळात बैठक, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण !

सिंधुदूर्ग – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि नारायण राणे यांच्यात थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे. शरद पवार हे आज सिंधुदूर्गच्या दौ-यावर गेले आहेत. या दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच नारायण राणे हे भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती.

तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्कात असल्याचंही बोललं जात होतं. परंतु याबाबत राणे यांना विचारले असता त्यांनी  असं काही नसल्याचं त्यावेळी म्हटलं होतं. परंतु आज नारायण राणे आणि शरद पवार यांच्यात बैठक होणार आहे. त्यामुळे नारायण राणे हे राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यामुळे नारायण राणे हे राष्ट्रवादीत जाणार का याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.

COMMENTS