पुणे – पर्वती विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या आबा बागूल यांना सोडण्याचे संकेत शरद पवार यांनी आज दिले आहेत. गेली दोन टर्ममध्ये हा मतदरासंघ राष्ट्रवादीकडं होता. परंतु दोन्ही टर्ममध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार पडला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ बदलून तो काँग्रेसकडे देण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. या मतदारसंघात सध्या भाजपच्या माधुरी मिसाळ या आमदार आहेत. शरद पवार यांनी दिलेल्या या संकेतामुळे हा मतदारसंघ आगामी निवडणुकीत काँग्रेसकडे दिला जाणार असल्याचं दिसत आहे.
पुणे महापालिकेतर्फे तळजाई टेकडीवर तयार करण्यात आलेल्या क्रिकेटपटु सदु शिंदे क्रिकेट स्टेडीयमचं उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं.यावेळी बोलत असताना पवार यांनी हे संकेत दिले आहेत. आबा बागूल सहाव्यांदा नगरसेवक आहेत. त्यांच्या बाबतीत विचार व्हायला पाहिजे असं यावेली पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. त्याचा धागा पकडत महाराष्ट्राचा गाडा सुरळीत चालवायचा असेल तर पृथ्वीराज बाबा आणि आम्हाला हातात हात घालूनच काम करावं लागेल.आबा बागूलांसारख्या कर्तृतववान माणसाला प्रोत्साहन देताना आम्ही पक्ष बघत नाही असं शरद पवार यांनी म्हटलं हे.
COMMENTS