मुंबई – भाजपचे विद्यमान आमदार अपूर्व हिरे यांनी आपल्या कुटुंबियांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिरे कुटुंबियांचा भाजप प्रवेश हा अपघात होता. अपघातातून सावरून ही गाडी आता योग्य मार्गावर आली असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
भाजपमध्ये प्रवेश हा हिरे कुटुंबियांचा अपघात होता. हिरे कुटुंबाची विचारधारा भिन्न आहे. मालेगावची राजकीय स्थिती बदलण्यासाठी छगन भुजबळ व जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला म्हणून हा पक्षप्रवेश झाला. भुजबळांच्या भुजांना प्रशांत, अपूर्व आणि अद्वय हिरे बळ देतील हा विश्वास आहे. pic.twitter.com/AblMaZXnWe
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 7, 2018
दरम्यान सरकारच्या धोरणांचा फटका कांदा उत्पादकांना बसत असल्याची टीकाही यावेळी पवार यांनी केली आहे. ज्यांनी नाशिक दत्तक घेतो म्हणून सांगितले त्यांनीच याकडं दुर्लक्ष केले. दत्तकविधान न टिकणारे होते. दत्तक बापावर नाशिक जिल्हा चालणारा नाही तर शेतकरी बापावर चालणारा असल्याचंही पवार म्हणाले आहेत.
एवढा दुष्काळ असताना केंद्राच्या पथकाकडून अंधारात दुष्काळ पाहिला जातोय. राज्य सरकार दुष्काळावरील उपाययोजना करण्यात कमी पडतंय. इतर घटकांना धक्का न लागता मराठा आरक्षण मिळावं. मुस्लिम आरक्षण दिलेच पाहिजे असंही यावेळी पवारांनी म्हटलं आहे.
COMMENTS