मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर
ईडीने राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची चर्चा आहे. याबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या गुन्ह्याशी माझा संबंध नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे.तसेच माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. बँकेकडून मला फोन आला, त्यात माझं नाव नसल्याची माहिती मला मिळाली. मी राज्य सहकारी बँकेशी संबंधित नव्हतो. मी कधीही बँकेचा संचालक नव्हतो. कुठल्याही बँकेच्या संचालक मंडळावर मी कधी नव्हतो. मी बँकेच्या निवडणुकीलासुद्धा कधी उभा राहिलो नव्हतो. ज्या संस्थेशी माझा कसलाही संबंध नाही, त्याच्यातल्या घोटाळ्यात मला गोवण्यात येत असेल तर काय बोलणार असं पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान या बँकेच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेशी माझा कधीही संबंध नव्हता. आता जी तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्यात कर्ज देण्याच्या अनियमितपणाबद्दल तक्रार केली होती. कर्ज देण्याच्या प्रक्रियेशी माझा कसा संबंध? तरीही माझ्यावर गुन्हा दाखल करण्याविषयी निर्णय घेतला असेल तर धन्यवाद देतो. मी ज्या बँकेचा सभासदसुद्धा नाही. मग त्या बँकेच्या घोटाळ्याच्या गुन्ह्यात माझाही सहभाग कसा नोंदवला?” असा सवाल शरद पवा यांनी केला आहे..
COMMENTS