बीड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. विविध मुंद्द्यांवर पवारांनी सरकावर जोरदार टीका केली आहे. ही सत्ता लोकांमुळे मिळते,त्याचा वापर लोकांसाठी कारायचा असतो. याचा विसर मोदी आणि फडणवीस यांना पडला आहे. समाजाचे सगळे घटक अस्वस्थ आहेत. त्यामुळे आता परिवर्तन केल्याशिवाय पर्याय नाही. लोकांच्या भुकेचा प्रश्न आहे,शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. मात्र सरकार काहीच करीत नाही. दुष्काळाचं संकट आहे, कर्जबाजारीपणा हे आत्महत्ये मागचं कारण आहे, पाऊस गायब झाला आहे, शिवार कोरडी पडली आहेत, सोयाबीन वाळून गेले आहे. शेतकरी हैराण असताना सरकार काहीच करीत नाही, आम्ही कर्जमाफी केली. आज शेतमालाला किमान दर मिळत नाही, मंत्री म्हणतात दर नाही दिले तर कायदा करू, मग करा ना कायदा कोणी अडवलं आहे, अशी जोरदारी टीका पवार यांनी केली आहे.
दरम्यान शेतमाल फेकून द्यावा लागत आहे. अशावेळी मालाला किंमत मिळत नाही, शंभर टक्के कर्जमाफी केली पाहिजे, या सरकारला तुमचं दुखणं दिसत नाही. या सरकारने बँकांची 81 हजार कोटींची कर्जमाफी केली, मोठ्या लोकांचे कर्जमाफ केले, मात्र शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं, त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं. आशा लोकांच्या हातात सत्ता देता कामा नये. देशात महागाई वाढत आहे, डिझेल,पेट्रोल,गॅस च भाव वाढले आहेत, रोज भाव वाढत आहेत,. दरवाढीमुळे एसटीची भाडेवाढ झाली त्याचा फटका शेतकरी,सामान्य माणसाला बसत असल्याचंही पावारांनी यावेळी म्हटलं आहे.
सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे, सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही. चार वर्षे झाली, हजरो सैनिक पाकने मारले, मोदींनी काय केलं असा सवालही पवारांनी केला आहे. जवान मारले जात असताना आमचे प्रधानमंत्री त्यांच्या पंतप्रधानांच्या घरी जेवतात, पाकची त्यामुळे मस्ती वाढली असल्याची टीकाही पवारांनी केली आहे.तसेच नेभळट लोकांच्या हातात सत्ता आहे,त्यामुळे ही सत्ता उलथून टाका, असं आवाहनही यावेळी पवार यांनी जनतेला केलं आहे.
राफेलबाबत स्पष्टीकरण
राफेलची विमान चांगली होती, आम्ही सत्तेत असताना किंमत ठरली नव्हती. नंतरच्या सरकारने किंमत ठरवली, 650 कोटींचं विमान 1600 कोटीत खरेदी केलं. या प्रकरणात माझ्यावर टीका केली की मी समर्थन केले. मी त्यांचं समर्थन करणार नाही.केंद्र सरकारने किंमत का वाढली याच उत्तर द्यावं. सर्वपक्षीय समिती गठीत करा. जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत मी कोणावर नाव घेऊन टीका करणार नाही. तसेच बोफोर्स प्रकरणात राजीव गांधी चौकशीला सामोरे गेले,आज मोदींनी चौकशीला सामोरे जावे. मोदी सरकारने राफेल प्रकरणात गोलमाल केला,चौकशीला सामोरे गेले पाहिजे, राफेलची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी शरद पवार यांन केली आहे. राफेलची दुरुस्ती नाशिकला होणार होती मात्र या दिवट्या सरकारने आमचा तो हक्क सुद्धा हिरावला, सगळं गोलमाल आहे, संसदीय कमिटीच्या माध्यमातून राफेलची चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी केली आहे.
COMMENTS