मुंबई – गडचिरोलीमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच यावरुन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.
गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना 'जनाची नाही तरी मनाची' लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही.
#naxalattack @CMOMaharashtra— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 1, 2019
दरम्यान गडचिरोलीत कुरखेडा तालुक्यातील दादापूर गावात नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी जात असलेल्या खासगी वाहनावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. यात राखीव दलाचे 16 जवान शहीद झाले असून, खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करुन आपला निषेध नोंदवला आहे.
सबब नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 1, 2019
COMMENTS