नाशिक – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली असून काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा 50-50 असा फॉर्म्युला ठरला असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्रातील 288 जागांपैकी प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, शेकाप आणि डावे पक्ष असलेल्या आघाडीमध्ये मित्रपक्षांपैकी कोणाला किती जागा मिळणार याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान काही जागांवर अदलाबदल शक्य असून नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबाद यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर संयुक्त सभांचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादीचा नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसेच आमच्यातले अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. राज्यात सत्ता त्यांची येईल अस काहींना वाटतंय. 27 वर्ष मी विरोधी बाकावर होतो. मला विरोधी पक्षात जास्त समाधान मिळालं. कारण विरोधकांची जबाबदारी येते तेव्हा थेट लोकांपर्यंत पोहचता येतं असंही पवारांनी म्हटलं आहे. ते नाशिक येथे बोलत होते.
COMMENTS