मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 52 वरुन 63 वर पोहोचला आहे. त्यामुळे प्रत्येकाची चिंता वाढली आहे. राज्य सरकारला कायम मार्गदर्शन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही आता या परिस्थितीवर मात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. शरद पवारांनी स्वतः परिस्थितीचा आढावा घेत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली आहे. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे.
दरम्यान राज्य सरकार मेडिकल कॉलेजसना सर्व उपकरणे देण्यास तयार आहे. पण मेडिकल कॉलेजसना कोरोना टेस्टिंग किट केंद्राने उपलब्ध करुन द्यावी, ही आमची केंद्राकडे मागणी आहे, असं टोपे म्हणाले आहेत.
तसेच शरद पवारांना सध्या महाराष्ट्राची पूर्ण माहिती सांगितली. टेस्टिंग फॅसिलीटी उपलब्ध करुन द्या असे सांगितले. सर्व लागणाऱ्या सुविधा द्या, सर्व खाजगी रुग्णालयांना परवानगी दिली पाहिजे अशी मागणीही टोपेंनी केली आहे.
तसेच ज्या जीवनावश्यक सेवा आहेत, मेडिकल, फार्मसी, बँकिंग, याव्यतिरिक्त लोकांनी प्रवास टाळावा, असं आवाहनही टोपेंनी केलं आहे.
COMMENTS