मुंबई – दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये तबलीग ए जमात या मुस्लीम संघटनेच्या मरकज या धार्मिक कार्यक्रमात हजारो लोक एकत्र आले आणि त्यातून कोरोना व्हायरसची अनेकांना लागण झाली. हे लोक देशभरात गेले असल्यानं कोरोनाचा फैलाव वेगवेगळ्या ठिकाणी झाला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला आहो. हा कार्यक्रम टाळता आला असता असं पवारांनी म्हटलं आहे.
देशभरात आता करोनाचा आजार वाढत आहे. आजची स्थिती पाहता आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. असे प्रकार पुन्हा घडता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. मरकजचा सोहळा टाळला पाहिजे होता. तसेच मुस्लिम लोकांनी घरातूनच नमाज अदा करावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.
दिल्लीत मरकजचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी हजारो लोक जमले होते. राज्यातलेही अनेकजण त्या ठिकाणी गेले होते. कार्यक्रमानंतर त्यातील काही लोक इतरत्र गेले. त्यातील काही लोकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊन त्यांनी एकत्र प्रवास केल्याचं नाकारता येत नाही. त्यामुळे असे कार्यक्रम टाळा असंही पवार म्हणाले आहेत.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अनेक पावलं उचलण्यात आली. ९० टक्के लोक सूचनांचं पालन करतायत पण १० टक्के लोकांकडून ते होत नाही. सर्वांनी नियम पाळून सरकारला सहकार्य करावं असंही पवार म्हणाले आहेत.
COMMENTS