एक्झिट पोल बरोबर आहेत का?, शरद पवारांची प्रतिक्रिया !

एक्झिट पोल बरोबर आहेत का?, शरद पवारांची प्रतिक्रिया !

मुंबई – लोकसभेच्या निकालापूर्वीचे एक्झिट पोल विविध मांध्यमांनी मांडले. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मागे एक मोठी ताकद उभी आहे. त्यामुळे ते वेगळी लाईन मांडत आहेत. परंतु येत्या दोन दिवसांत सत्य समोर येईल. लोकांच्या चिंता दूर होतील. असं पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने काल मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीदरम्यान पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात चौथ्यांदा केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मागील दीड महिन्यांपासून सुरु असलेली निवडणुकीची रणधुमाळी संपवून थकवा दूर करण्यासाठी आणि देवदर्शनासाठी मोदी केदारनाथला गेले होते. मोदींच्या या केदारनाथ दर्शनावरही पवारांनी टीका केली आहे. शरद पवार यांनी मोदींच्या केदारनाथ दर्शनाला ‘नौटंकी’ असल्याचे म्हटले आहे. सध्या राजकारणात नौटंकी सुरु आहे. काल संध्याकाळपासून वृत्तवाहिन्यांवरही नौटंकीच चालू होती. मोदींचं केदारनाथला जाणं हीदेखील नौटंकी असल्याचं ते म्हणाले आहेत.

COMMENTS