बारामती – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.’अजितदादा अर्थमंत्री होता म्हणून तुम्हाला वीजेचं बील न भरण्याची सवय लागली आहे. ती सवय आता मोडा,’ असं पवारांनी शेतक-यांना म्हटलं आहे. दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांनी हे विधान केलं आहे. शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर आहेत.
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार आज एकत्रित दुष्काळ दौऱ्यावर आहेत. बारामती आणि दौंड तालुक्यातील गावांना ते भेटी देत आहेत.बारामती तालुक्यातील खैरेपडळ येथील जनावरांच्या छावणीस भेट देऊन त्यांनी या दुष्काळ दौऱ्याला प्रारंभ केला आहे. शरद पवार यांचा लोकसभा निवडणुकीतला पराभव विसरून गेल्या अनेक दिवसांपासून दुष्काळ दौरा चालू आहे. आजड्या दौ-यात शरद पवार आणि अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी देखील उपस्थित आहेत.
यावेळी पाऊस पडेपर्यंत नाहीतर नवा चारा तयार होईपर्यंत जनावरांसाठी चारा छावण्या चालवाव्या लागतील. याबाबत सरकार विनंती करू,’ असं आश्वासन शरद पवार यांनी उपस्थितांना दिलं आहे.
COMMENTS