मुंबई – पाच राज्यांमधील लागलेल्या विधानसभा निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही तर परिवर्तनाची सुरुवात असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. भाजपाचा प्रचार, त्यांनी घेतलेले निर्णय याबाबत लोकांनी नाराजी व्यक्त केली असून भाजप सोडून अन्य राजकीय पक्ष एकत्र येतात, भूमिका घेतात हे सगळ्यांत समाधानी असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान नोटबंदीचा निर्णय आर्थिक क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला न घेता घेतला गेला.अन्य संस्थांवर हल्ला करण्याबाबत भूमिका घेतली. ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती पत्रकार परिषद घेतात, निश्चित याचा परिणाम सामान्य लोकांवर होतो. आरबीआयवर पण हल्ला करण्याची भूमिका घेतली, तीन वर्षांचा कालावधी असून गर्व्हनर राजीनामा देऊन गेले. सीबीआय प्रमुखांना सक्तीने रजेवर पाठवलं गेलं. संस्था महत्वाच्या आहेत त्यामुळे या बाबी काळजी करण्यासारख्या असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसने भाजपाला पर्याय देण्याची महत्वाची भूमिका बजावली आहे. आम्हा सगळ्यांचे स्थान मर्यादित आज, जिथे मर्यादित स्थान आहे तिथे मत विभाजणीचे काम करू नये.प्रचारात आपली मतं मांडायची असतात, टीका टिपणी करताना मर्यादा ठेवायच्या असतात.त्यांनी जी आश्वासन दिले होती, निवडणुकीत ते विसरले. निवडणूक प्रचारात व्यक्तिगत हल्ले केले.
तसेच एका कुटुंबाने काही केलं नाही असं बोलतात, पण ज्या कुटुंबाबाबत बोलतात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आजच्या पिढीने नेहरू, इंदिरा गांधी पाहिले नाही, राजीव गांधी पाहिले नाही. प्रचारात एका कुटुंबावर हल्ला केला, सोनिया गांधी पक्ष अध्यक्ष, राहुल गांधी खासदार हे दोघे सत्तेत नव्हते, त्यांच्यावर हल्ला केला ते अनुकूल ठरलं नाही उलट लोकांना हे हल्ला का करतात हे आश्चर्य वाटलं अशीही पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.
सत्ता दर्प मनात आला की लोक त्याची नोंद वेगळ्या पद्धतीने घेतात, संसदीय लोकशाही मजबूत झाली. पंतप्रधान ही संस्था आहे .त्याचा आदर राखला पाहिजे. तसेच आगामी निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र राहतील असा अंदाजही पवारांनी व्यक्त केला आहे.
तसेच 50 टक्क्यांहुन अधिक फटका नागरी भगत बसला. सगळ्या स्तरात नापसंती आहे. राहुल गांधींबाबत टिंगल टवाळी मोहीम राबवली. राहुल गांधी चार टर्म संसदेत आहेत, ते आता लोकांना पसंत पडले. सत्ताधा-यांनी पैशाचा वापर केला, त्याचा परिणाम जनमाणसावर झाला नाही. काँग्रेस पक्षाने नेतृत्व नव्या पिढीकडे सोपवलं ते लोकांनी स्वीकारलं आहे. अपेक्षा आहे की पुढील निवडणूक येतील त्यावेळी देशातील चित्र बदलले दिसेल. तिसरी आघाडी किंवा युपीए 3 असं काही नाही. देशपातळीवरील प्रश्नांसाठी आपापसातील मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे असंही यावेळी पवारांनी म्हटलं आहे.
COMMENTS