राज्य सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही ही अत्यंत गंभीर बाब -शरद पवार

राज्य सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही ही अत्यंत गंभीर बाब -शरद पवार

मुंबई – गडचिरोलीमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नक्षलवादी हल्ला नित्याची गोष्ट झाली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लहान मोठे हल्ले झाले आहेत. आजचा हल्ला गंभीर आहे. परंतु राज्य सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे आहे. हे हल्ले सतत होता याचा अर्थ मुख्यमंत्री आपली जबाबदारी पार पाडायला अपयशी ठरले आहेत. जी व्यक्ती सामान्य माणसांची आणि सरकारी कर्मचार्‍यांच्या रक्षणाची जबाबदारी घेऊ शकत नाही अशा व्यक्तीला या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आपण जवानांच्या हत्या बघायच्या का ?
आजचे सरकार ठोस पावलं उचलायला अपयशी झाले आहे. त्यामुळे या सरकारला पायउतार करण्याशिवाय पर्याय नसल्याचही पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS