बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी सरकारबाबत सर्वात मोठं भाकित केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं, तरी या सरकारची अवस्था वाजपेयींच्या 1996 च्या सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं 13 किंवा 15 दिवस टिकणार असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. भाजप विरोधातील सर्व पक्षांची मोट बांधण्याचं काम सुरु असून त्याला 21 मे रोजी मूर्त रुप येईल, असंही पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. आजपर्यंत पवार यांनी केलेले अनेक दावे खरे ठरले आहेत. त्यामुळे आगामी सरकारबाबत पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं, तरी या सरकारची अवस्था वाजपेयींच्या 1996 च्या सरकारसारखी होईल. हे सरकार अवघं 13 किंवा 15 दिवस टिकणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पवार यांनी केलेला हा दावा खरा ठरणार का? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
COMMENTS