लोकसभेतील पराभवानंतर शद पवारांची भावनिक पोस्ट !

लोकसभेतील पराभवानंतर शद पवारांची भावनिक पोस्ट !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भावनिक पोस्ट केली आहे. शरद पवारांनी इन्स्टाग्रामवर ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ थकलो आहे जरी, तरी अजून झुकलो नाही आणि  जिंकलो नसलो तरी अजून ही हरलो नाही, या आशयाची पोस्ट टाकून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना न खचण्याचं आवाहन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या निवडणुकीत पाच जागा मिळाल्या आहेत. अपेक्षित असं यश मिळालं नसलं तरी खचून जाऊ नका असं पवारांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (बारामती), उदयनराजे भोसले (सातारा), सुनील तटकरे (रायगड), डॉ. अमोल कोल्हे (शिरूर), नवनीत राणा कौर (अमरावती), यांचा विजय झाला आहे.

तसेच अपेक्षित असं यश न मिळाल्यामुळे धनंजय मुंडे यांनी देखील ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई, देखो और सुधार करो… असं म्हणत त्यांनी आत्मचिंतन करायला लागणार असल्याचं सुचित केलं. जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढाईचे मैदान सोडू नका… असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना आधार दिला आहे.

दरम्यान पवारांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ राष्ट्रवादीला राखता आला आला आहे. या मतदारसंघातून सुप्रिया सुळे सलग तिसऱ्यांदा खासदारपदी निवडून आल्या आहेत. सुप्रिया सुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत नक्की हरणार, असा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
तरीही भाजपच्या कांचन कुल यांनी निवडणुकीत कडवी झुंज दिली आहे. तसेच पार्थ पवारांच्या मावळमधील पराभवाने मात्र पवारांच्या कुटुंबाने पहिल्यांदाच हार पाहिली आहे. त्यानंतर पवारांनी आज भावनिक पोस्टकेली आहे.

COMMENTS