मुंबई – मोदी सरकारनं बळीराजाशी बेईमानी केली असू या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. आधी आश्वासनं द्यायची आणि नंतर ढुंकूनही पहायचं नाही हेच मोदीराज्य असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे. तसेच या सरकारने शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसाचं हित पाहिलं नाही. त्यांना या घटकांशी काहीही घेणंदेणं नाही. कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र सरकार त्यांना मदतही करत नाही. त्यामुळे जे शेतकऱ्याशी इमान राखत नाहीत त्यांना सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही असे पवार यांनी म्हटले आहे. बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते.
दरम्यान सरकारने आर्थिक मागासांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल. ग्रामीण आणि शहरी विभागातील शिक्षणाचा दर्जा पाहिला तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा शहरी विद्यार्थ्यांसमोर निभाव लागणार नाही. त्यामुळे नोकऱ्यांमध्ये ग्रामीण तरुणांचं स्थान अस्थिर होईल असंही पवारांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS