मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या ‘झंझावात’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला खासदार शरद पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शरद पवार यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश कसा केला याबाबतची आठवण सांगीतली.
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय हा चिठ्ठी टाकून घेतला होता असा दावा शरद पवार यांनी केला.
दरम्यान यावेळी नारायण राणे यांनी माझ्या जीवनातील अतीशय महत्वाचा सुवर्ण अक्षराने लीहून ठेवावा असा हा क्षण आहे. बँकेत किती पैसे आहेत यापेक्षा पवारांनी प्रस्तावनेत लीहीलेलं कौतुक, माझ्या कामाची प्रशंसा, तुमचा हा लेख अतीमोलाचा आहे. न सांगता न बोलता नेहमीप्रामाणे सांगून गेला आहेत. पुस्तकात मी काय लीहीलं यापेक्षा पवार साहेबांचा लेख मला मार्गदर्शन करणारा आहे. तुमच्यासारखे नेते राज्याला, देशाला मिळावे अशी प्रेरणा दिली यासाठी आभार असं म्हणत पवारांचे आभार मानले आहेत.
COMMENTS