मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ संकट नाही, तर राष्ट्रीय आपत्ती आहेत, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.नेहमी काँग्रेस सरकारच्या काळात काहीच झाले नाही, असे ते सांगत फिरतात. पण, गेल्या पाच वर्षांत त्यांनी काय दिवे लावले हे सांगत नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उमेदवार नवनीत राणा, आमदार रवि राणा, राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराथी, अनिल देशमुख, हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, रावसाहेब शेखावत, वसुधा देशमुख, काँग्रेसचे नेते डॉ. देवीसिंह शेखावत, केवलराम काळे, राजकुमार पटेल आदी उपस्थित होते.
दरम्यान आजवर देशात विरोधकांचाही सन्मान केला जात होता. पण, या सरकारच्या काळात सत्तेचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर करण्यात आला. संसदीय लोकशाहीतील संस्था उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केले. आम्ही सर्व विरोधकांनी सशक्त असा पर्याय उभा केला आहे, आम्हाला ते ‘मिलावट’ संबोधतात. आम्ही २६ राष्ट्रीय पक्ष एकत्र आलो आहोत, पण एनडीएत ३६ पक्ष आहेत, हे पंतप्रधानांनी विसरू नये. आम्ही २००४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी तयार केली, दहा वर्षे देशात चांगले सरकार दिले. सरकार चांगल्या पद्धतीने चालवण्याचा अनुभव आमच्याकडे असल्याचंहू पवारांनी म्हटलं आहे.
COMMENTS