शरद पवारांची पंतप्रधान मोदींना मिश्कील कोपरखळी !

शरद पवारांची पंतप्रधान मोदींना मिश्कील कोपरखळी !

अहमदनगर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिश्कील कोपरखळी मारली आहे. काय गडी भारीए… पाहिजेल ते करतो अन् रोज माझं बोट धरतो असा टोला पवारांनी लगावला आहे. लोकांचा असा समज होता की माझं आणि मोदींचं चांगलं जमतं. मी कृषीमंत्री असताना जमायचंही, असा खुलासाही पवारांनी केला आहे. ते अहमदनगरमधील शेवगांव येथे घेण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते.

दरम्यान  शरद पवारांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो असं मोदी म्हणतात हे खरं आहे. पण मी शेजारचं राज्य म्हणून त्यांना मदत केली असल्याचंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. मी शेतीमालाला भाव वाढविण्याची भूमिका पार्लमेंटमध्ये मांडली होती.  त्यानंतर प्रधानमंत्री मला आल्यावर मागणी योग्य नसल्याचे बोलले. सरकारचे धोरण स्वत: ला प्रसिद्धी करण्याचे आहे. पाच वर्षात २४५ कोटी जाहिरातींवर खर्च केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ५५ महिन्यांमध्ये ९२ वेळा परदेशात गेले. या दौऱ्यासाठी दोन हजार कोटी खर्च केला. काळा पैसा आणण्याचे सांगितले. लोकं वेडी झाली. स्वित्झर्लंडला गेले. सर्वांना भेटले. हात हालवत माघारी आले. आणि सांगायचं काय हा प्रश्न होता. रात्रीच नोटाबंदी केली. अख्खा देश रांगेत उभा राहिला.

दरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी ही बाई देश सोडून जाईल असे लोक म्हणत होते. मात्र सोनिया गांधी उभ्या राहिल्या. देशासाठी योगदान दिले. तरीही नरेंद्र मोदी त्यांच्यावर टीका करत आहेत. तसेच मोदींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत मी लुंग्यापुग्यांच्या टीकेला मोजत नसल्याचंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS