औरंगाबाद – नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर टीका केली. पाकिस्तानची मी स्तुती केल्याचे ते बोलले. वास्तवात, पाकिस्तानमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे असे सत्ताधारी व सैन्य ज्यांच्या हातात ते सैन्याधिकारी सतत भारताविरोधात बोलतात, वातावरण तयार करतात,असे मी म्हणालो.आपल्या हातात सत्ता कायम राहावी, अधिकार कायम राहावेत याची ते काळजी घेतात. पाकिस्तानचे सत्ताधारी, पंतप्रधान, राष्ट्रपती, सैन्याधिकारी हे सगळेजण पाकिस्तानच्या जनतेला धोका देतात, हे मी बोललो. आणि मोदी इथं सांगतात मी पाकिस्तानची स्तुती केली. ही काय पाकिस्तानची स्तुती आहे का ? असा सवाल शरद पवार यांनी औरंगाबादमधील सभेत केला आहे.
नाशिकच्या सभेत पंतप्रधान @narendramodi यांनी माझ्यावर टीका केली. पाकिस्तानची मी स्तुती केल्याचे ते बोलले. वास्तवात, पाकिस्तानमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे असे सत्ताधारी व सैन्य ज्यांच्या हातात ते सैन्याधिकारी सतत भारताविरोधात बोलतात, वातावरण तयार करतात,असे मी म्हणालो.#औरंगाबाद pic.twitter.com/kZnWJfLmK0
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 20, 2019
दरम्यान १९६७ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी मी पहिल्यांदा निवडून आलो. ७ वेळा संसद व ७ वेळा विधिमंडळात गेलो. महाराष्ट्राच्या जनतेने मला कधी अपयश येऊ दिले नाही. जो माणूस सतत ५२ वर्षे एकही दिवसाची सुटी न घेता काम करतो,त्याच्याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी आपली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासावे. असंही पवारांनी म्हटलं आहे.
१९६७ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी मी पहिल्यांदा निवडून आलो. ७ वेळा संसद व ७ वेळा विधिमंडळात गेलो. महाराष्ट्राच्या जनतेने मला कधी अपयश येऊ दिले नाही. जो माणूस सतत ५२ वर्षे एकही दिवसाची सुटी न घेता काम करतो,त्याच्याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी आपली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासावे. pic.twitter.com/2RR17IEmiP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 20, 2019
तसेच ते काहीही बोलण्याइतके कर्तृत्ववान आहेत. त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. मलाही बोलता येतं पण मी बोलणार नाही. त्याचं कारण पंतप्रधान ही एक संस्था आहे. हे पद लोकशाहीमधील महत्वाचं पद आहे. या पदाची मला किंमत ठेवायची आहे. या पदाची मला अप्रतिष्ठा होऊ द्यायची नाही,हे मी मुद्दाम सांगतो असंही यावेळी पवारांनी म्हटलं आहे.
‘विकासाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा कुणाचा हात धरून जावं असा प्रश्न येतो तेव्हा शरद पवार हेच नाव माझ्यासमोर येतं.’ हे पंतप्रधान @narendramodi म्हणाले होते. कधी म्हणता माझी करंगळी धरून चालता. मग निवडणूक आली की असं बोलता. हे वागणं बरं नव्हं. हे बोलणं योग्य नाही. pic.twitter.com/YS4LnBBx3i
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 20, 2019
तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेमद्र फडणवीस नाशिकला काय बोलले त्याने फरक पडत नाही. कारण ते काहीही बोलू शकतात. कारण नागपूरचे त्यांच्यावर संस्कारच हे आहेत. त्यामुळे हे फडणवीस काय आणि नाना फडणवीस काय, कुठलेही फडणवीस काय बोलणार हे सांगायची गरज नाही. पण पंतप्रधानांनी असे बोलण्याची गरज नव्हती. असंही पवार म्हणालेत.
COMMENTS