…आबा तर आज तुम्ही आमच्यात असता, आर. आर. पाटलांविषयी बोलताना शरद पवार भावूक !

…आबा तर आज तुम्ही आमच्यात असता, आर. आर. पाटलांविषयी बोलताना शरद पवार भावूक !

सांगली – राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भावूक झाले असल्याचं पहावयास मिळाले आहे. आबा तुम्ही माझं ऐकलं नाही. जर तुम्ही माझं ऐकलं असतं, तर आज तुम्ही आमच्यात असता. पण दुर्दैव की रोगाने तुमच्यावर घाला घातला,आबा तुम्ही माझ्यापेक्षा वयानं फार लहान होता.” माझ्यासारख्या माणसाच्या अगोदर आबा का गेले? असं भावनिक वक्तव्य आज शरद पवार यांनी सांगलीमध्ये बोलताना केलं आहे.

दरम्यान यावेळी पवारांनी आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा देताना घडलेल्या घटना आणि त्यावर आर. आर. पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेची आठवण करुन दिली. दहशतवादी कसाबला फाशी देण्याच्या वेळी केंद्रीय गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सावधानतेचा इशारा दिला होता. कसाबला फाशी दिल्यास राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातील ज्या गृहमंत्र्याच्या काळात कसाबला फाशी दिली जाईल, त्या गृहमंत्र्याच्या जीवाला आयुष्यभर धोका राहिल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली होती. मी आर. आर. आबांना ही माहिती सांगितली होती.परंतु त्यांनी निर्भीडपणे कायदा-सुव्यवस्थेची जबाबदार पार पाडत कसाबला फाशी दिली असंही यावेळी पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS