मुंबई – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कानंत्र दिला आहे. काँग्रेसचे पुनरुज्जीवन होणं ही देशाची गरज आहे. परंतु हे होत असताना काँग्रेसची जी मूळ परंपरा आहे, त्याप्रमाणे काँग्रेसला पुन्हा एकदा उभारी देण्याची जबाबदारी नेतृत्वाने घेतली पाहिजे. तसेच गांधी परिवार हा काँग्रेस पक्षाचा सिमेंटिंग फोर्स आहे. त्यामुळे हा परिवार वगळून काँग्रेस राहणार नाही. पण गांधी परिवारानेही आपण म्हणजेच काँग्रेस या भूमिकेत राहू नये,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला. परंतु पक्षातील नेत्यांनी राजीनामा देऊ नये अशी विनंती केली. परंतु तरीही राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला शरद पवार यांनी एक कानमंत्र दिला आहे. काँग्रेसचे पुनरुज्जीवन होणं ही देशाची गरज आहे. परंतु हे होत असताना काँग्रेसची जी मूळ परंपरा आहे, त्याप्रमाणे काँग्रेसला पुन्हा एकदा उभारी देण्याची जबाबदारी नेतृत्वाने घेतली पाहिजे असं पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS