मुंबई – काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विलिनीकरणाच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. मी राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष आहे. मला पक्षाच्या निर्णयाची अधिक माहिती आहे. आमच्या पक्षाचं स्वतंत्र आस्तित्व आहे आणि आम्ही शिंदे साहेबांपेक्षा राष्ट्रवादी जास्त जाणतो असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यवतमाळमधील सभेत ते बोलत होते.
दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपवरही जोरदार टीका केली आहे. निवडणूक काळात 10 रुपयात जेवण देण्याची घोषणा उद्धव ठाकरे करत आहेत. केंद्रात आणि राज्यात त्यांचीच सत्ता आहे मग हे आजपर्यंत का केले नाही. ही घोषणा म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसेच सरकार सत्तेचा गैरवापर करून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याच्याशी माझा संबंध नाही, त्या विषयात माझ्यावर गुन्हा दाखल केला. त्यात माझं नाव गोवलं गेलं. मग फरार दाखवण्यापेक्षा मीच येतो असे सांगितले. या राज्यात निर्दोष माणसाला गुन्हे दाखल करून अटक केली जात असल्याचा आरोपही पवारांनी केला आहे.
COMMENTS