शरद पवारांनी मानले शिवसेनेचे आभार!

शरद पवारांनी मानले शिवसेनेचे आभार!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज ईडीच्या कार्यालयात जाणार होते. परंतु
आपण ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब करत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब करत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब करतोय, असंही पवार म्हणाले.

दरम्यान ईडीनं गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना ईतर पक्षातील नेत्यांनी पाठिंबा दर्शवला होता.
कुठल्याही तक्रारीत नाव नसताना शरद पवारांवर गुन्हा दाखल का केला गेला, असा सवाल आता सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला. इतकंच नाही, तर आजपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसच्या राजवटीतही एव्हढं टोकाचं राजकारण कधी झालं नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला होता. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पवारांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे शरद पवारांनी यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि शिवसेनेचे या प्रकरणात त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

COMMENTS