या मुद्यावरुन शिवसेना-राष्ट्रवादीत एकमत झालं नाही – शरद पवार

या मुद्यावरुन शिवसेना-राष्ट्रवादीत एकमत झालं नाही – शरद पवार

कराड – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाली, पण यावरून एकमत झालं नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदाची मागणी राष्ट्रवादीची होती परंतु शिवसेनेनं ते मान्य केलं नाही.उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा अजित पवार यांचा निर्णय व्यक्तिगत असल्याचं सांगत याला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा नाही आणि मुळात हे पक्षाचं धोरणंही नाही. अजित पवारांनी असं का केलं माहिती नाही, असंही पवार म्हणाले आहेत.

दरम्यान पवारांच्या या वक्तव्यानंतर
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची ऑफर आम्ही दिलेली नाही, तर फडणवीसांनी अजित पवारांना दिली असेल असं राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे या मुद्यावरुनच अजित पवार यांनी बंड केली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

COMMENTS