भाजप-शिवसेना युतीबाबत शरद पवारांचे भाकीत !

भाजप-शिवसेना युतीबाबत शरद पवारांचे भाकीत !

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं एकला चलोची हाक दिली आहे. परंतु दोन्ही निवडणुकांमध्ये सोबत येण्याची विनवणी भाजपकडून केली जात आहे. त्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनी मातोश्रीची वारी देखील केली. परंतु अजूनही शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत आहे.  त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे एकत्र येणार नसल्याचं बोललं जात आहे. परंतु याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक भाकीत वर्तवलं आहे.

ते म्हणजे, आगामी निवडणुकीत आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. परंतु या दोन्ही पक्षांमध्ये फक्त लोकसभेसाठी युती होईल विधानसभेसाठी होणार नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसून सध्या तशी परिस्थिती नसल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच आगामी निवडणुका या मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात ही सर्व विरोधी पक्षांची भूमिका असून याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS