मुंबई – शिवसेना आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी एकत्र येवून सरकार स्थापन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. प्रभावी विरोधी पक्ष हीच आमची जबाबदारी असल्याचा आज पवार यांनी पुनरुच्चार केला आहे. शिवसेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार अजून झालेला नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
तसेच अयोध्या प्रकरणाच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही अयोध्येच्या निकालावरून महाराष्ट्रातलं राजकारण बदलणार नाही. दोन-तीन दिवसात लोक विसरून जातील. तसेच बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं. युतीला जनतेनं कौल दिला आहे. प्रभावी विरोधी पक्ष ही आमची जबाबदारी आहे असं पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी काल आमच्याकडे दुसरे पर्याय खुले आहेत असं म्हटलं आहे. परंतु शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यारुन राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे.
COMMENTS