उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत शरद पवारांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया !

उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत शरद पवारांनी ‘अशी’ दिली प्रतिक्रिया !

पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीत सातारचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याबाबत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साताऱ्यातील नेत्यांची भेट झालीय. त्यामध्ये उदयनराजेंना उमेदवारी देऊ नका असं कुणीही बोललेलं नाही. त्यामुळे त्या बातमीत तथ्य नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच साताऱ्यामध्ये लोकसभा तसेच राज्यसभेच्या दृष्टिकोनातून सर्वांशी चर्चा सुरु आहे. सर्वजण एकत्रित विचार करून पुढील गोष्टी ठरवणार आहेत. असही यावेळी पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यानन राफेल व्यवहार नेमका किती किंमतीचा आहे, याचा खुलासा सरकारनं करायला हवा. त्यात गुप्तता बाळगण्याचं काही कारण नाही. मी स्वत: संरक्षणमंत्री होतो. त्यामुळे कोणती माहिती द्यायची आणि कोणती नाही हे मला माहिती आहे. बोफोर्स प्रकरणाच्या वेळी आज सत्तेत असलेल्या आणि तेव्हा विरोधात असलेल्या सुषमा स्वराज वगैरे मंडळी बोफोर्सच्या आर्थिक व्यवहार खुले करण्याची मागणी करत होत्या. आज तेच लोक रोफेलची माहिती देत नसल्याचीटी टीकाही पवार यांनी केली आहे.

COMMENTS