मुंबई – केंद्रात विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना विनंती केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच शरद पवार यांनी पुढाकार घेऊन विरोधकांचा मोर्चा एकत्रित बांधण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. तसेच याबाबत शरद पवार यांच्यासोबत पुढील आठवड्यात सोनिया गांधी या बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान विरोधी पक्षांतील नेत्यांची बैठक शरद पवार यांच्या घरी झाली असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहेत. त्यामुळे शरद पवार यांनीही विरोधी पक्षांची मोट एकत्रित बांधण्यास सुरुवात केली असल्याचं दिसून येत आहे. यावरुन आगामी निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सर्वच विरोधी पक्ष एकत्र येऊन भाजपला टक्कर देणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS