उस्मानाबाद – विधानसभा निवडणुकीसाठी उद्या परंडा मतदारसंघातुन राहुल मोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः शरद पवार भूम येथे येणार आहेत.राष्ट्रवादी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी स्वत: माहिती दिली आहे. राहुल मोटे या मतदारसंघातून 3 वेळेस विजयी झाले आहेत.
ते आता चौथ्यांदा नशीब आजमावणार आहेत.
राहुल मोटे हे माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील यांचे भाचे आहेत.
दरम्यान शरद पवार मंगळवारी भूम शहरात सकाळी 10 वाजता येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली आहे. 43 वर्षीय राहुल मोटे हे सलग तीन वेळा आमदार असून त्यांचे वडील दिवंगत नेते महारुद्र मोटे हे दोन वेळा आमदार होते.राहुल मोटे हे 2004, 2009 आणि 2014 या तीन निवडणुकात विजयी झाले आहेत. त्यामुळे मोटे परिवाराची या मतदारसंघात 25 वर्ष सत्ता आहे. राहुल मोटे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय नातलग असून मोटे यांचं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग शिक्षण झालं आहे. आगामी निवडणुकीतही त्यांना विजयी करण्यासाठी पवारांनी मोठी ताकद लावली असून त्यांचा सामना शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्यासोबत होणार आहे.
COMMENTS