पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व भारीप नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एकाच मंचावर दिसणार आहेत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त ते एकत्र येणार आहेत. रविवारी सायंकाळी 5 वाजता महालक्ष्मी लॉन्समध्ये आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या गाजत असलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणावर ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आ. ह. साळुंखे यांनी शोषित वंचित घटकांच्या प्रबोधनासाठी मोठे कार्य केलं आहे. बहुजन समाजातील आघाडीचे विचारवंत म्हणूनही समाजात त्यांची ओळख आहे. त्यामुळे या कार्यक्रमात जातीव्यवस्थेवर चर्चा केली जाणार हे नक्की आहे. तसेच भीमा कोरेगाव दंगलीनंतर हिंदुत्ववाद्यांवर पहिली टीका शरद पवार यांनी केली होती. त्याचदिवशी प्रकाश आंबेडकर यांनी भिडे- एकबोटेंवर आरोप केले होते. त्यामुळे पवार आणि प्रकाश आंबेडकर हे दोघंही या प्रकरणाबाबत सरकारवर हल्लाबोल करणार असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS