शरद पवार, रविकांत तुपकरांमधील बैठक संपली, लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय !

शरद पवार, रविकांत तुपकरांमधील बैठक संपली, लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय !

मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यामधील बैठक संपली आहे. या बैठकीत अंतिम प्रस्ताव सादर करण्यात आला असून आघाडीच्या जागा सोडण्याबाबत स्वतः शरद पवार काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत. बुलढाणा राष्ट्रवादीकडे आणि वर्धा काँग्रेसकडे असल्याने त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे असल्याचं प्रतिपादन पवारांनी केलं आहे.

दरम्यान मोदींचा पराभव करण्यासाठी आघाडी होणे आवश्यक असून स्वतंत्र उभे राहून मतांची विभागणी करू नका असं आवाहन यावेळी शरद पवार यांनी स्वाभिमानीच्या नेत्यांना केलं आहे. तसेच स्वाभिमानीच्या काँग्रेसकडील जागांच्या बाबतीतला आघाडीचा तिढा सोडवण्यासाठी पवार पुढाकार घेणार असून खासदार राजू शेट्टी पुन्हा एकदा सभागृहात गेले पाहिजेत.

त्यासाठी आघाडीची चर्चा सुरू होण्यापूर्वीच मी हातकणंगले त्यांना सोडला होता.बुलढाणा राष्ट्रवादीकडे आहे आणि वर्धा काँग्रेसकडे असल्याने चर्चा कण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच ही आघाडी तुटू देऊ नका एवढीच इच्छा असल्याचंही पवारांनी यावेळी तुपकर यांना म्हटलं आहे.

COMMENTS