राज्यात राजकीय भूकंप होणार, संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या भेटीला!

राज्यात राजकीय भूकंप होणार, संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या भेटीला!

मुंबई – राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुन्हा शरद पवारांच्या भेटीला जाणार आहेत. पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांची आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यापूर्वीच संजय राऊत त्यांच्या भेटीला येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात नवा भूकंप होण्याची शक्यता आहे.

दरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन संघर्ष सुरु आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून आता सत्तास्थापनेसाठी चाचपणी सुरु आहे. संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन नव्या प्रस्तावावर चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असून, राज्यातील शेतकऱ्यांनाही शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा असल्याचे  त्यानी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी असल्याचे यापूर्वीच सांगण्यात येत आहे. तर, काँग्रेस नेतेही बाहेरून पाठिंबा देण्याच्या तयारी आहेत. त्यामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण उदयास येते की काय अशी चर्चा आहे. त्यामुळे आता पवार आणि राऊत यांच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS