शरद पवारांची मोठी खेळी, शिवेंद्रराजेंविरोधात यांना उमेदवारी पक्की?

शरद पवारांची मोठी खेळी, शिवेंद्रराजेंविरोधात यांना उमेदवारी पक्की?

सातारा – साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. परंतु शिवेंद्रराजे यांच्याविरोधात शरद पवार यांनी मोठी खेळी खेळली असल्याचं दिसत आहे. कारण शिवेंद्रराजे यांच्याविरोधात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या आई कल्पनाराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

याच पार्श्वभूमवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कल्पना राजे भोसले यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे. कल्पना राजे भोसले यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या दोघांमध्ये बंद दराआड जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. साताऱ्यात विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराचे नेतृत्व आणि आमदारकीची उमेदवारी याविषयी त्यांच्यात चर्चा झाल्याचं देखील सांगितलं जात आहे. ‘साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच राखेल’, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत साताऱ्यात कल्पना राजे भोसले विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले असा सामना रंगण्याची शक्यता आहे .

COMMENTS