मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली, विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या या बैठकीस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. पवईच्या रेनिसान्स हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्यासह छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची देखील उपस्थिती होती.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांशी @PawarSpeaks साहेबांच्या उपस्थितीत @ShivSena च्या प्रमुख नेत्यांनी एका बैठकीत विस्ताराने चर्चा केली.@OfficeofUT @AUThackeray @supriya_sule @Jayant_R_Patil @dhananjay_munde pic.twitter.com/yeaZjLil9P
— NCP (@NCPspeaks) November 24, 2019
दरम्यान यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना काही प्रश्न केले. तुम्हाला काही अडचण आहेत का? तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? असे प्रश्न शरद पवारांनी आमदारांना विचारले. यावेळी या आमदारांनी आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, असं म्हटलं.
दरम्यान या बैठकीस मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना आपल्याकडे संख्याबळ आहे, आपण निश्चित बहुमत सिद्ध करू असे सांगितले. तसेच, काळजी करू नका, आपली युती बरीच पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.या बैठकीनंतर पवार आणि ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा देखील झाली. यावेळी सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
COMMENTS