महाराष्ट्र 60 वर्षांचा तर मी 80 वर्षांचा झालोय, शरद पवारांनी दिले नव्या भूमिकेचे संकेत !

महाराष्ट्र 60 वर्षांचा तर मी 80 वर्षांचा झालोय, शरद पवारांनी दिले नव्या भूमिकेचे संकेत !

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी काळातील नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र 60 वर्षांचा झालाय तर मी 80 वर्षांचा झालोय. आता या वयात नवं व्हिजन काय पाहणार. वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणं योग्य नाही. तर आता तरुणांना व्हिजन द्यायचं आणि ते काय करतात ते बघायचं असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकारणातून शरद पवार हे लवकरच निवृत्त होणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान मी आता हळूहळू काम थांबवतोय. आता तरुणांना व्हिजन देण्याचं काम मी करतोय. कारण नवी पिढी पुढे गेली पाहिजे त्यांच्या हातात कारभार दिला पाहिजे. मी आता तेच करतोय. तरुणांना व्हिजन देत त्यांचं काम मी पाहात असतो. त्यांनी विचारलं तरच सल्ला देतो. कारण न विचारता सल्ला देणं आणि सतत कामांमध्ये हस्तक्षेप करणं हे योग्य नसतं. त्यामुळे तुमचा मान राहात नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे. ते ‘एबीपी-माझा’च्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते.

COMMENTS