शरद पवार सांगली, सातारा दौय्रावर, पूरग्रस्तांची घेणार भेट!

शरद पवार सांगली, सातारा दौय्रावर, पूरग्रस्तांची घेणार भेट!

मुंबई – कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला जोरदार पावसामुळे मोठा फटका बसला आहे. अनेकांचे जीव गेले आहेत. तर लाखो नागरिक बेघर झाले आहेत. या पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी राज्यभरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नेत्यांकडून मदत केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी मदत केली जात आहे. राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांकडून एका महिन्याचं मानधन देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यानंतर शरद पवार हे आज पूरग्रस्त सांगली आणि सातारा दौय्रावर आहेत. या दौर्‍यादरम्यान ते पूरग्रस्तांची भेट घेत आहेत.

शरद पवार यांनी काल बारामतीत तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी पवारांनी लोकांना पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं. शरद पवारांच्या या आवाहनाला तालुक्यातील लोकांनी मोठा प्रतिसाद देत अवघ्या तासाभरात 1 कोटींचा निधी उभा केला. त्यानंतर आज ते स्वत: पूरग्रस्तांची भेट घेत आहेत.

दरम्यान शरद पवार यांनी आवाहन केल्यानंतर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानकडून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी 25 लाख रुपयांची मदत देण्यात आली. याशिवाय माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी पाच लाखांची मदत दिली. त्यानंतर बारामतीतल्या व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांसह धान्य, कपडे आणि भांड्यांची मदत देण्यात आली आहे. याशिवाय सहकारी साखर कारखान्यांनी 400 पोती साखर देण्याचे जाहीर केले आहे. या मदतीमुळे सांगली साताय्रातील पूरग्रस्तांना मोठा आधार मिळणार आहे.

COMMENTS