रत्नागिरी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज तिवरे दुर्घटनास्थळाला भेट दिली. यावेळी पवार यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर फंडातून त्यांनी मृतांच्या 9 नातेवाईकांना प्रत्येकी एक लाखांची मदत केली आहे. तसेच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासनही पवार यांनी यावेळी दिलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटून तब्बल २३ जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण अद्यापही बेपत्ता आहेत. हसतंखेळतं तिवरे गाव एका रात्रीत उद्ध्वस्त झालं. याा घटनेचं गांभीर्य लक्षात घेता या दुर्घटनास्थळाला आज पवारांनी भेट दिली. तसेच त्यांनी येथील नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
COMMENTS