मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 12 डिसेंबरला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्यावतीने सरकार विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. नागपूर येथे हा मोर्चा काढण्यात येणार असल्याच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
‘या सरकार विरोधात शरद पवार यांच्या वाढदिवस दिवशी जन आक्रोश आंदोलन केले जाणार असून. या आंदोलनात पवार साहेब ही सहभागी होतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसचे नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेत्याची बैठक झाली. या बैठकीला अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, विखे पाटील, अजित पवार, सुनिल तटकरे, जयंत पाटील, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते. विधानपरिषद रिक्त जागेच्या निवडणूकीवरुन यात चर्चा झाली.
‘विधान परिषद जागा जिंकण्यासाठी लढायचे आहे. आम्ही याबाबत चर्चा करत आहे. पुढे निर्णय घेऊ.’ असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
COMMENTS