शिर्डी – आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातसध्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. याबाबत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फॉर्म्युला सांगितला आहे. काँग्रेसला 120 राष्ट्रवादी काँग्रेसने 120 असं जागा वाटपाच सुत्र येत्या आठ दिवसात संपवून पुढच्या कामास लागवे असं वक्तव्य शरद पवार यांनी श्रीरामपूर येथे केलं आहे.
दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून इतर नेत्यांच्या बरोबरीने आता नातेवाईकही पक्ष सोडून जाताय या प्रश्नावर पवार भडकले असल्याचं पहावयास मिळाले. इथे नातेवाईकांचा काय प्रश्न यावर तुम्ही माफी मागा अशी पवारांनी पत्रकारांना तंबी भरली. तसेच पक्ष बदलून जाणाय्रांना आम्ही काही कमी केलेल नाही त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांना दुसय्रा पक्षात जाऊन कदाचीत जास्त काम करण्याची संधी मिळणार असेल. भाजपा सेनेकडे लोका़ंचा ओघ सुरु आहे. त्यांची धरण, भरतायत त्यांच्या कँचमेट एरीयात पाऊस नाही त्यामुळे ते जिथून पाणी येईल तिथून धरण भरुण घेतायेत अशी टीकाही पवारांनी केली आहे.
तसेच ईव्हीएममध्ये फेरफार करता येतो याचे पुरावे आहेत. मात्र त्यांनी लोकांना संशय येऊ नये म्हणून काही ( सुप्रीया सुळेच्या बारामती मतदारसंघात) बदल केले नाहीत. निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे कोणाला काय बोलायच ते बोलून घेतायेत त्यामुळे ते फार मनावर घ्यायच नाही.
राज्य सहकारी बँकेत झालेल्या गैरकारभाराच्या चौकशीत काहीही समोर येणार नाहीये. रिझर्व्ह बँकेतून निधी घेण हे अर्थव्यवस्था आणखी आडचणीत येईल असं मला वाटतं. जम्मू- कश्मीर राज्यातून ३७० कलम रद्द केल्यानंतर तिथे आपण जमीन घेऊ शकतो पण इशान्य पुर्वेकडील राज्यात आपण जमिनी घेऊ शकत नाही त्यावर सरकारने बोलावे असंही यावेळी पवारांनी म्हटलं आहे.
COMMENTS