महाराष्ट्रात सर्वात मोठं बंड होणार – शरद यादव

महाराष्ट्रात सर्वात मोठं बंड होणार – शरद यादव

मुंबई – जेडीयूचे नेते शरद यादव यांनी आज मुंबईतील रुग्णालयात लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान आम्ही दोन विधानपरिषद लढत आहोत. तसेच लालूप्रसाद यादव यांनाही भेटायचं होतं. लालूंच्या प्रकृतीची विचारपूस करायला आलो होतो. या निवडणुका येणाऱ्या इतिहासाची इमारत आहेत. देशातला कुठलाही वर्ग  भाजप सरकारमुळे उद्ध्वस्त झाला असून देशात अघोषित आणीबाणी सुरु असल्याची जोरदार टीका शरद यादव यांनी केली आहे. तसेच देशातल्या सर्व पक्षांनी भाजपविरोधात एकत्र यावे ही जनतेची इच्छा असून त्या एकत्रिकरणासाठी आमचा प्रयत्न सुरु असल्याचंही शरद यादव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आम्ही आता झालेल्या सर्व पोटनिवडणुका या सर्वपक्षीय युतीत जिंकल्या आहेत. जसा संपूर्ण देश अस्वथ आहे तशी शिवसेनाही अस्वस्थ आहे. तसेच इतिहास साक्ष असणार आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठं बंड होणार असून  बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध असल्याचंही यावेळी शरद यादव यांनी म्हटलं आहे.

COMMENTS