नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकाराचा आज शपथविधी झाला. या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अपमान झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. कार्यक्रमासाठी शरद पवार यांना चक्क पाचव्या रांगेतला पास देण्यात आला होता. त्यामुळे शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीेने ही बातमी दिली आहे. पवारांना पाचव्या रांगेतला पास मिळाला होता. दुपारी तीन वाजता हा पास मिळलाा. त्यानंतर पवार यांच्या कार्यालयाने याबाबत संंबधितांना तक्रार केली. त्यानंतर पास बदलून देण्यात आला. मात्र तो पाचव्या रांगेतलाच देण्यात आला. हा आपल्या ज्येष्ठत्वाचा अपमान असल्याचं पवार यांना वाटलं त्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.
खरंतर शरद पवार खास या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी दिल्लीा आले होते. शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्रचे मुख्यमंत्री पदी राहिले आहेत. यूपीए सरकराच्या काळात ते दोन वेळा केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. तसंच वाजपेयी सरकारच्या काळात मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसचे लोकसभेतील नेते राहिलेले आहेत. असं असतना पवारांना पाचव्या रांगेत स्थान दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. शरद पवार यांचा हा अपमान हा महाराष्ट्रचा अपमान असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मोदींनी बारामतीमध्ये येऊन पवार हे माझे राजकीय गुरू असल्याचं म्हटलं होतं. मात्र या पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पवार यांच्यावर मोदी यांनी जहरी टीका केली होती. दोघांमधील संबंध ताणले असल्याचं बोलंलं जातंय.
COMMENTS