दिल्ली – केंद्रातल्या भाजप सरकारकारविरोधात महाआघाडी उभारण्यासाठी विविध नेते पुढाकार घेत आहेत. दिल्लीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये भाजप विरोधात आघाडी स्थापन करण्यासाठी विविध मित्र पक्षांशी बोलणी करण्याचे सर्वाधिकार राहुल गांधी यांना दिले आहेत. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांची भेट घेतली. यावेळी बसपाचे सरचिटणीस सतिषचंद्र मिश्राही उपस्थित होते. ट्विट करुन शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1022129246985019392
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला स्वबळावर सत्ता मिळाली नाही तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणत्याही नेत्याला पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ शकते अशी माहिती आहे. तशी चर्चा काँग्रेस कार्यकारणी बैठकी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. वेळ आल्यास मायावती किंवा मतता बॅनर्जी यांनाही पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला जाऊ शकतो अशी काँग्रेसमधील सुत्रांची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सुरू केलेल्या या भेटीगाठी कार्यक्रमाला महत्व आलं आहे.
COMMENTS