बँक दरोड्यातील आरोपी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात, चक्क घेतली शरद पवारांची भेट !

बँक दरोड्यातील आरोपी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात, चक्क घेतली शरद पवारांची भेट !

सोलापूर – मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्यमंडळानं नुकतीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं या शिष्टमंडलानं पवारांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतलं. मात्र ही भेट आता वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. या भेटीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पवारांना भेटलेल्या शिष्टमंडळात चक्क एका बँक दरोड्यात आरोपी असलेल्या व्यक्तीचा समावेश होता.

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या ७८ लाख रुपयाच्या दरोड्यातील आरोपी रामेश्वर मासाळ याला सामिल केल्याने पक्ष नेमका कसा मजबुत करायचाय असा प्रश्न नागरीक विचारु लागले आहेत . सांगोला येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रची पैसे घेवुन जाणारी व्हॅन १ नोव्हेंबर २०१७ ला पंढरपूर सांगोला रस्त्यावर खर्डी गावाजवळ  लुटण्यात आल्याने खळबळ माजली होती. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक अमोल भोसले यानी हा बनाव रचला होता. या तपासात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष रामेश्वर मासाळ याचे नाव पुढे आले होते .सध्या तो जामिनावर बाहेर असताना मंगळवेढा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या भेटीला जाताना असा दरोड्यातील आरोपी नेलाच कसा असा प्रश्न आता विचारले जावु लागलेत.

COMMENTS