मराठा आंदोलनावर शरद पवार यांचे निवेदन, “यांच्यावर” साधला निशाणा !

मराठा आंदोलनावर शरद पवार यांचे निवेदन, “यांच्यावर” साधला निशाणा !

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं मराठा आंदोलनानं गेल्या दोन दिवसात अधिक तीव्र झालं आहे. काल एका तरुणांनं या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच निवेदन केलं आहे. आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडून केल्या जात असलेल्या विधानामुळे परिस्थिती चिघळली असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. यापूर्वी शांततेत आंदोलने झाली, कायदा व्यवस्थेला धक्का पोहोचू दिला नाही, मात्र याची सरकारने दखल घेतली नसल्यामुळे उद्रेकाची परिस्थिती निर्माण झाली असं पवार म्हणाले. मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे आंदोलन चिघळ्याचं पवार यांनी सूचित केलं आहे.

मराठा समाजातील उच्चशिक्षितांचा विचार करू नका मात्र मराठा समाजातील वंचित घटकांचा विचार करावा असं आवाहनही पवार यांनी केलं आहे. आंदोलनातील घटकांशी सरकारने त्वरीत संवाद साधावा असं आवाहनही पवार यांनी सरकारला केलं आहे. तमिळनाडू प्रमाणे महाराष्ट्रात आरक्षण  ७० टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येते असंही पवार म्हणाले. आंदोलकांनीही स्वतःचा जीव धोक्यात न घालता आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान न करता आंदोलन करावं असं आवाहनही पवार यांनी आंदोलकांना केलं आहे. पवार पत्रकामध्ये नेमकं काय म्हणाले ते पत्र खाली दिलं आहे.

COMMENTS