इंग्रजी वाहिनीला शरद पवारांची मुलाखत, पंतप्रधान पदाच्या उमेदाराबाबत  पवारांचं मोठं विधान !

इंग्रजी वाहिनीला शरद पवारांची मुलाखत, पंतप्रधान पदाच्या उमेदाराबाबत  पवारांचं मोठं विधान !

भाजप विरोधात मजबूत आघाडी करण्यासाठी अनेक पक्ष एकवटले आहेत. शरद पवारही विरोधकांची आघाडी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. काहीजण काँग्रेसह भाजपविरोधात एकच आघाडी करण्यासाठी प्रय़त्नशील आहेत. तर काही प्रादेशिक नेते काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांनी मात्र तिस-या आघाडीच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. तिस-या आघाडीचा प्रयोग याआधी फारसा यशस्वी झाला नाही. मात्र जिथं जिथं शक्य आहे तिथे विरोधकांनी एकत्र यायला पाहिजे असंही पवार म्हणाले. टाईम्स नाऊ या इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी हे मत मांडलं आहे.

सध्याची राजकीय स्थिती ही 1977 सालासाऱखी आहे. त्यावेळी इंदिरा गांधी या प्रंचड ताकदवान होत्या. तरीही त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. सध्या नरेंद्र मोदी ताकदवान आहेत. त्यामुळे विरोधकांनी जिथे जिथे शक्य आहे. तिथे एकत्र यावे आणि भाजपला पराभूत करावे. इंदिरा गांधीना पराभूत केल्यानंतर सर्व विरोधक एकत्र आले होते. आणि त्यातूनच पंतप्रधान पदासाठी मोरारजी देसाई यांचं नाव पुढे आलं होतं. यावेळीही निवडणुकीच्या आधी विरोधी आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करता येणार नाही. भाजपला पराभूत केल्यानंतर सर्वसहमतीने एखादे नाव पुढे येईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही असंही शरद पवार म्हणाले.

COMMENTS